काय सांगू आता संतांचे उपकार | मज निरंतर जागविती || काय द्यावे त्यासी व्हावे उतराई | ठेविता हा पायी जीव थोडा ||सहज बोलणे हित उपदेश | करुनी सायास शिकविती ||तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती | तैसे मज येती सांभाळीत ||