धन्य ते सभाग्य नर आणि नारी | करिताती वारी पंढरीची || तयांचे चरणी माझे दंडवत | जे नेमे माझ्या गात विठोबासी || दिवाळी दसरा अवघे पर्वकाळ | नांदती सकळ तया घरी || चोखा म्हणे धन्य धन्य ते संसारी | नेमे करिती वारी पंढरीची ||
अर्थ इतुकाची साधिला l वेद अनंत बोलिला l विठोबासी शरण जावे l निजनिष्ठे नाम गावे l सकळ शास्त्रांचा विचार l अंती इतुकाची निर्धार l अठरा पुराणे सिद्धांत l तुका म्हणे हाचि हेत l