एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि॥१॥
आठवीन पाय हा माझा नवस । रात्र आणि दिवस पांडुरंगा ||२॥
बहु दूरवरी भोगविले भोग । आतां पांडुरंगा सोडवावें ||३||
तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओंवाळूनि सांडीं मस्तक हें ||४||
एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि॥१॥
आवडे देवासी तो ऐका प्रकार ।। नामाचा उच्चार राञंदिवस ।।१।।
आवडे देवासी तो ऐका प्रकार ।। नामाचा उच्चार राञंदिवस ।।१।।
तुळशीमाळ गळा गोपीचंद टिळा ।। ह्रदयी कळवळा वैष्णवांचा ।।२।।
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ।। साधन निर्धारी आण नाही ।।३।।
एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम ।। तो देवा परम पुज्य जगी ।।४।
का गा रुसलासी कृपाळु बा हरी । तुजविण दुसरी भक्ति नेणे ॥
का गा रुसलासी कृपाळु बा हरी । तुजविण दुसरी भक्ति नेणे ॥
दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥
आशा मोह माया लागलीसे पाठी । काळ क्रोध दृष्टी पाहतसे ॥
सावता म्हणे देवा नको ठेऊ येथे । उचलोनि अनंते नेई वेगी ॥
Subscribe to:
Posts (Atom)