कासावीस प्राण मन तळमळी । जैसी कां मासोळी जीवनाविण ॥1

दाही दिशा वोस वाटती उदास । करिताती सोस मनामाजी ॥2

घातियेली घोण प्राण आला कंठी । ज्ञानदेवासाठी तळमळी ॥3

नामा म्हणे देवा वाटतसे खंती ।चालली विभूति योगियाची 4