दह्यांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥१॥ आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ ध्रु.॥ पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी समसाटी करूं नये ॥२॥ तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजूं नये ॥३॥